Monday, 21 July 2014

सस्नेह  नमस्कार 
रौप्य महोत्सवी वर्ष पार केलेला 'पुरुष उवाच' गट 'पुरुष उवाच तरुणाईच्या डोक्याला खुराक !' या नावाने २००७पासून  दिवाळी अंक प्रकाशित करतो आहे. य़ा अंकांना पुरस्कारही मिळाले आहेत.  दिवाळी २०१४ साठी आपण लेखन करावं यासाठी ही खास पत्रभेट !
पुरुष उवाचचा दिवाळी अंक ही समतेच्या वाटेवर, नि:शब्दता ओलांडत ,पुरुषांनी माणूसपणाची वाटचाल करण्यासाठीची छोटीशी चळवळच आहे,अशी आमची भावना आहे . पुरुष प्रधानव्यवस्थेत दमन ,शोषण करणाऱ्या पुरुषांचही माणूसपण हिरावलं जात ,या वास्तवाची जाण जास्तीत जास्त पुरुषांच्या मनात जागी व्हावी आणि त्याची माणूसपणाची वाटचाल सुकर व्हावी हा प्रयत्न या अंकाच्या माध्यमातून आम्ही करत असतो . आपल्या सारख्या जाणकारांच्या लेखनान अंकाचा दर्जा वाढायला मदत होईल या विश्वासाने  ही लेखनाची विनंती!

यावर्षीच्या दिवाळी अंकात  'मधुचंद्राची रात्र  -स्वप्नातली /वास्तवतली 'या विशेष विभागात अनुभव कथन , 'संशय का मनी … 'या सदरात संशयाच्या भुतामुळे नात्यात निर्माण झालेले ताणतणाव ,त्यातुन उद्धभवणारे मनोकायिक आजार इ .विषयांवर अनुभव कथन ,किस्ये गमती जमती कथा ,कविता ,मानसशास्त्रीय विश्लेषण आदी अपेक्षित आहे . पुरुषांच्या विशेष जिव्हाळ्याचा  विषय:शीघ्रपतन ,टक्कल बिक्कल,men-o-pause, 'flirting-flirting आणि इतर, असे आपल्याला महत्वाचे वाटणारे विषय आपण लेखनासाठी घेऊ शकता. 
बुरुज ढासळताना … या महत्वाच्या विषयावर पुरुषी अहंकाराचे बुरुज कसे ढसळले यांचे रोचक वर्णन करणार अनुभव कथन ,विनोदी किस्से ,कथा ,कविता यामुळे अंकाची रंगत वाढेल असं आम्हाला वाटत.  याशिवाय पुरुषाची भूमिका या स्वरुपात पुरुष प्रधानतेला विरोध करत चांगल्या मानवी जगण्याच्या इछेचे प्रतिबिंब उमटणाऱ्या इतरही लेखनाची वाट पाहत आहोत 

हा अंक ना नफा ना तोटा या तत्वावर काढत असल्यामुळे आम्ही लेखनासाठी मानधन देऊ शकत नाही हे नम्रपणे नमूद करत आहोत.  आपले लेखन हा या चळवळीतील आपला मोलाचा सजर्नशील सहभाग आहे असं आम्ही मानतो.  आपलं लेखन वरील पत्यावर ५ सप्टेंबर २०१४ पर्यंत आम्हाला पोहचावे .  शब्द मर्यादा १५००ते २००० शब्द. धन्यवाद ! प्रतिसादाच्या अपेक्षेत !!

संपर्क -९८२२७४६६६३

आपले ,
मुकुंद किर्दत , गीताली वि. मं . 
'पुरुष उवाच' करिता